होम
  • रेझ्युमे आणि CV
    रेझ्युमे टेम्पलेट्ससर्व पहा
    साधे
    प्रत्येक रिक्रूटरला तुमच्या सामग्रीवर लक्ष केंद्रित करणारे मिनिमल लेआउट्स.
    व्यावसायिक
    अनुभव आणि नेतृत्व दर्शवणारे बोर्डरूम-तयार टेम्पलेट्स.
    आधुनिक
    नवकल्पक भूमिका आणि कंपन्यांसाठी ताजी, समकालीन डिझाइन्स.
    सर्जनशील
    डिझाइन-केंद्रित करिअरसाठी तयार केलेले ठळक व्हिज्युअल्स आणि अनोखे लेआउट्स.
    ATS अनुकूल
    प्रत्येक Applicant Tracking System पार करण्यासाठी विशेषतः संरचित.
    रेझ्युमे बिल्डर
    रेझ्युमे बिल्डर
    तात्काळ AI सूचनांसह जॉब-रेडी रेझ्युमे ड्रॅग, ड्रॉप आणि एक्सपोर्ट करा.
    Chrome browser
    Firefox browser
    Opera browser
    Safari browser
    OwlApply एक्स्टेंशन इन्स्टॉल करा
    Chrome मधून थेट जॉब फॉर्म्स ऑटोफिल करा, टेलर्ड रेझ्युमे तयार करा आणि पोस्टिंग्ज स्कोअर करा.
  • AI करिअर साधने
    AI करिअर साधनेसर्व AI साधने पहा
    कीवर्ड ऑप्टिमायझर
    रिक्रूटर-मान्य कीवर्ड्स जोडा आणि ATS निकालांमध्ये वर या.
    AI रेझ्युमे बिल्डर
    AI-लिखित बुलेट्स आणि सिद्ध लेआउट्ससह पॉलिश्ड रेझ्युमे तयार करा.
    रेझ्युमे ट्रान्सलेटर
    सूक्ष्म अर्थ न गमावता तुमचा रेझ्युमे कोणत्याही भाषेत अनुवाद करा.
    रेझ्युमे सारांश
    प्रत्येक भूमिकेसाठी टेलर केलेले लक्षवेधी सारांश तयार करा.
    रेझ्युमे बुलेट पॉइंट जनरेटर
    उपलब्धी काही सेकंदांत प्रभावी बुलेट पॉइंट्समध्ये बदला.
    कव्हर लेटर जनरेटर
    प्रत्येक जॉब पोस्टिंगशी जुळणारी परिपूर्ण लेटर्स तयार करा.
    जॉब अर्ज ऑटोफिल
    प्रमुख जॉब बोर्ड्सवरील पुनरावृत्ती अर्ज फील्ड्स स्वयंपूर्ण करा.
    रेझ्युमे चेकर
    तात्काळ AI फीडबॅकने संरचना, कीवर्ड्स आणि प्रभाव ऑडिट करा.
    रेझ्युमे बिल्डर
    रेझ्युमे बिल्डर
    तात्काळ AI सूचनांसह जॉब-रेडी रेझ्युमे ड्रॅग, ड्रॉप आणि एक्सपोर्ट करा.
    Chrome browser
    Firefox browser
    Opera browser
    Safari browser
    OwlApply एक्स्टेंशन इन्स्टॉल करा
    Chrome मधून थेट जॉब फॉर्म्स ऑटोफिल करा, टेलर्ड रेझ्युमे तयार करा आणि पोस्टिंग्ज स्कोअर करा.
  • कव्हर लेटर्स
    कव्हर लेटर टेम्पलेट्ससर्व पहा
    साधे
    पारंपारिक टीम्स आणि एंट्री-लेव्हल भूमिकांसाठी योग्य स्वच्छ लेआउट्स.
    व्यावसायिक
    अधिकार आणि विश्वासार्हता मजबूत करणारी क्लासिक बिझनेस स्टाइलिंग.
    आधुनिक
    टेक आणि हाय-ग्रोथ कंपन्यांमध्ये योग्य वाटणाऱ्या स्लीक डिझाइन्स.
    सर्जनशील
    पॉलिश न सोडता व्यक्तिमत्व दर्शवण्यासाठी अनोखा कॅनव्हास.
    कव्हर लेटर बिल्डर
    कव्हर लेटर बिल्डर
    मार्गदर्शित प्रॉम्प्ट्स वापरून मिनिटांत तुमच्या रेझ्युमेशी जुळणारे लेटर तयार करा.
    Chrome browser
    Firefox browser
    Opera browser
    Safari browser
    OwlApply एक्स्टेंशन इन्स्टॉल करा
    Chrome मधून थेट जॉब फॉर्म्स ऑटोफिल करा, टेलर्ड रेझ्युमे तयार करा आणि पोस्टिंग्ज स्कोअर करा.
  • संसाधने
    संसाधनेसर्व पहा
    OwlApply एक्स्टेंशन
    अर्ज ऑटोफिल करा, कव्हर लेटर्स तयार करा, आणि ब्राउझरमधून प्रत्येक नोकरी ट्रॅक करा.
    नोकरी मुलाखत
    प्रत्येक मुलाखत प्रकारासाठी स्क्रिप्ट्स, फ्रेमवर्क्स आणि आत्मविश्वास वाढवणारे.
    कव्हर लेटर
    लक्षात राहणाऱ्या कव्हर लेटर्ससाठी कथा-आधारित टेम्पलेट्स आणि रणनीती.
    करिअर
    तज्ञ सल्ल्याने वाटाघाटी, पदोन्नती आणि करिअर बदल नेव्हिगेट करा.
    रेझ्युमे
    कोणत्याही उद्योगात उत्कृष्ट रेझ्युमे तयार करण्यासाठी चरणबद्ध मार्गदर्शन.
    रेझ्युमे बिल्डर
    रेझ्युमे बिल्डर
    तात्काळ AI सूचनांसह जॉब-रेडी रेझ्युमे ड्रॅग, ड्रॉप आणि एक्सपोर्ट करा.
    Chrome browser
    Firefox browser
    Opera browser
    Safari browser
    OwlApply एक्स्टेंशन इन्स्टॉल करा
    Chrome मधून थेट जॉब फॉर्म्स ऑटोफिल करा, टेलर्ड रेझ्युमे तयार करा आणि पोस्टिंग्ज स्कोअर करा.
  • किंमत
मराठीBahasa IndonesiaBahasa MelayuCatalàČeštinaDanskDeutschEestiEnglishEspañolFilipinoFrançaisHrvatskiItalianoKiswahiliLatviešuLietuviųMagyarNederlandsNorskPolskiPortuguês (Brasil)Português (Portugal)RomânăSlovenčinaSlovenščinaSrpskiSuomiSvenskaTiếng ViệtTürkçeΕλληνικάБългарскиРусскийУкраїнськаעבריתالعربيةفارسیहिन्दीবাংলাગુજરાતીதமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยአማርኛ日本語简体中文繁體中文한국어
माझे खातेरेझ्युमे तयार करा
मराठीBahasa IndonesiaBahasa MelayuCatalàČeštinaDanskDeutschEestiEnglishEspañolFilipinoFrançaisHrvatskiItalianoKiswahiliLatviešuLietuviųMagyarNederlandsNorskPolskiPortuguês (Brasil)Português (Portugal)RomânăSlovenčinaSlovenščinaSrpskiSuomiSvenskaTiếng ViệtTürkçeΕλληνικάБългарскиРусскийУкраїнськаעבריתالعربيةفارسیहिन्दीবাংলাગુજરાતીதமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยአማርኛ日本語简体中文繁體中文한국어
  • रेझ्युमे आणि CV
    साधे

    प्रत्येक रिक्रूटरला तुमच्या सामग्रीवर लक्ष केंद्रित करणारे मिनिमल लेआउट्स.

    व्यावसायिक

    अनुभव आणि नेतृत्व दर्शवणारे बोर्डरूम-तयार टेम्पलेट्स.

    आधुनिक

    नवकल्पक भूमिका आणि कंपन्यांसाठी ताजी, समकालीन डिझाइन्स.

    सर्जनशील

    डिझाइन-केंद्रित करिअरसाठी तयार केलेले ठळक व्हिज्युअल्स आणि अनोखे लेआउट्स.

    ATS अनुकूल

    प्रत्येक Applicant Tracking System पार करण्यासाठी विशेषतः संरचित.

    सर्व पहा
  • AI करिअर साधने
    कीवर्ड ऑप्टिमायझर

    रिक्रूटर-मान्य कीवर्ड्स जोडा आणि ATS निकालांमध्ये वर या.

    AI रेझ्युमे बिल्डर

    AI-लिखित बुलेट्स आणि सिद्ध लेआउट्ससह पॉलिश्ड रेझ्युमे तयार करा.

    रेझ्युमे ट्रान्सलेटर

    सूक्ष्म अर्थ न गमावता तुमचा रेझ्युमे कोणत्याही भाषेत अनुवाद करा.

    रेझ्युमे सारांश

    प्रत्येक भूमिकेसाठी टेलर केलेले लक्षवेधी सारांश तयार करा.

    रेझ्युमे बुलेट पॉइंट जनरेटर

    उपलब्धी काही सेकंदांत प्रभावी बुलेट पॉइंट्समध्ये बदला.

    कव्हर लेटर जनरेटर

    प्रत्येक जॉब पोस्टिंगशी जुळणारी परिपूर्ण लेटर्स तयार करा.

    जॉब अर्ज ऑटोफिल

    प्रमुख जॉब बोर्ड्सवरील पुनरावृत्ती अर्ज फील्ड्स स्वयंपूर्ण करा.

    रेझ्युमे चेकर

    तात्काळ AI फीडबॅकने संरचना, कीवर्ड्स आणि प्रभाव ऑडिट करा.

    सर्व AI साधने पहा
  • कव्हर लेटर्स
    साधे

    पारंपारिक टीम्स आणि एंट्री-लेव्हल भूमिकांसाठी योग्य स्वच्छ लेआउट्स.

    व्यावसायिक

    अधिकार आणि विश्वासार्हता मजबूत करणारी क्लासिक बिझनेस स्टाइलिंग.

    आधुनिक

    टेक आणि हाय-ग्रोथ कंपन्यांमध्ये योग्य वाटणाऱ्या स्लीक डिझाइन्स.

    सर्जनशील

    पॉलिश न सोडता व्यक्तिमत्व दर्शवण्यासाठी अनोखा कॅनव्हास.

    सर्व पहा
  • संसाधने
    OwlApply एक्स्टेंशन

    अर्ज ऑटोफिल करा, कव्हर लेटर्स तयार करा, आणि ब्राउझरमधून प्रत्येक नोकरी ट्रॅक करा.

    नोकरी मुलाखत

    प्रत्येक मुलाखत प्रकारासाठी स्क्रिप्ट्स, फ्रेमवर्क्स आणि आत्मविश्वास वाढवणारे.

    कव्हर लेटर

    लक्षात राहणाऱ्या कव्हर लेटर्ससाठी कथा-आधारित टेम्पलेट्स आणि रणनीती.

    करिअर

    तज्ञ सल्ल्याने वाटाघाटी, पदोन्नती आणि करिअर बदल नेव्हिगेट करा.

    रेझ्युमे

    कोणत्याही उद्योगात उत्कृष्ट रेझ्युमे तयार करण्यासाठी चरणबद्ध मार्गदर्शन.

    सर्व पहा
  • किंमत
माझे खातेरेझ्युमे तयार करा
  1. होम
  2. AI करिअर साधने
  3. ATS Resume Checker: रेझ्युमेचा ATS स्कोअर

ATS Resume Checker: रेझ्युमेचा ATS स्कोअर

पाठवलेल्या अर्जांना उत्तर येत नसेल, तर चूक नेहमी तुमच्या अनुभवात नसते. कधी चूक फाइलमध्ये असते. स्क्रीनवर नीटनेटका दिसणारा रेझ्युमे पलीकडे उघडताना दोन कॉलम एकमेकांत घुसलेले दाखवू शकतो. किंवा फोन नंबरशिवाय पोहोचू शकतो, कारण नंबर पानाच्या हेडरमध्ये टाकलेला असतो आणि सॉफ्टवेअर हेडरच्या आत डोकावतच नाही.

फाइल अपलोड करा, तुम्ही तिला रेझ्युमे म्हणा किंवा CV, आणि पाहा तिच्यातून कच्चा मजकूर कोणत्या अवस्थेत बाहेर येतो, ओळ क्रमांकासह, एक एक ओळ. लेआउट, फॉन्ट आणि संपर्क माहितीबाबत जे सापडते, ते प्रत्येक वेळी त्याच्या उपायासह येते, खातं काढण्याच्या आणि कार्ड टाकण्याच्या आधीच.

तुमचा रेझ्युमे येथे टाका किंवा फाइल निवडा.

फक्त PDF आणि DOCX. कमाल फाइल आकार 2MB.

तुमचा रेझ्युमे अपलोड करा
गोपनीयतेची हमी
अपलोड केलेल्या रेझ्युमे फाइलमधून आलेला ओळ-क्रमांकासह कच्चा मजकूर, बाजूला वाचनीयतेच्या त्रुटी

पान पाहून न कळणाऱ्या तीन गोष्टी

फाइल विश्लेषण, ज्यात अक्षरांच्या तुटलेल्या मॅपिंगमुळे मजकूर वाचता येत नाही अशा स्वरूपात निघतो

ज्या फाइलमधून अक्षरांचा कचरा बाहेर पडतो

डिझाइन अ‍ॅपमधून निघालेल्या काही PDF स्क्रीनवर बेदाग दिसतात आणि कॉपी केल्यावर त्यांतून अक्षरांचा खिचडा बाहेर येतो. अक्षरांचे आकार बरोबर काढलेले असतात, पण कोणता आकार कोणत्या अक्षराचा, हे फॉन्टमध्ये कुठेच नोंदलेले नसते. फाइलमधून मजकूर ओढणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या हाती कचरा येतो. एक परिच्छेद निवडा, Notepad मध्ये चिकटवा, तेव्हाच लक्षात येईल. हे तपासून पाहायचे कोणाच्या डोक्यातच येत नाही. आम्ही मजकूर स्वतः काढून तुमच्यासमोर ठेवतो.

हेडरमध्ये अडकलेल्या संपर्क माहितीची त्रुटी आणि ती हलवण्याची सूचना देणारे कार्ड

ज्या नंबरवर कोणी फोन करत नाही

Word मध्ये आणि PDF मध्येही हेडर हा वेगळा थर असतो, मुख्य मजकुरापासून तोडलेला. भारतात चालणारे बरेच टेम्पलेट नाव, फोन आणि ईमेलचा पूर्ण ब्लॉक तिथेच ठेवतात, म्हणजे दुसऱ्या पानावर तो आपोआप पुन्हा येतो. नंबर त्याच ब्लॉकमध्ये असेल तर बहुतेक पार्सर त्यावरून निघून जातात. अर्ज पोहोचतो, फक्त परत फोन करण्याचा मार्ग सोबत जात नाही, आणि पलीकडच्या माणसाला काही राहिले आहे असा संशय येण्याचे कारणच नसते. तुमच्या स्क्रीनवर सगळे तिथेच दिसत राहते जिथे तुम्ही लिहिले होते.

रेझ्युमे फाइलमध्ये सापडलेल्या लपलेल्या मजकुराचा तपशील, संबंधित शब्दांसह

तुम्ही कधीच न लिहिलेले शब्द

काही रेझ्युमेमध्ये डोळ्याला न सापडणारा मजकूर पडून असतो: पांढऱ्यावर पांढरे लिहिलेले शब्द, किंवा चार पॉइंटपेक्षा लहान केलेला फॉन्ट. हे बहुतेक वेळा डाउनलोड केलेल्या टेम्पलेटसोबत येते, नाहीतर दोन आवृत्त्या आधीच्या कापाकापीतून उरलेले असते. स्क्रोल करून ते सापडणार नाही. पार्सर त्याचा प्रत्येक शब्द वाचतो, आणि HR च्या नजरेत ते फसवणुकीच्या प्रयत्नासारखेच वाचले जाते. तुमच्या फाइलमध्ये असे काही असेल तर आम्ही नेमके तेच शब्द दाखवतो.

तुमचा रेझ्युमे स्कोअर आत्ता मिळवा!

तुमचा ATS स्कोअर तात्काळ पाहण्यासाठी, गंभीर समस्या शोधण्यासाठी आणि सुधारणा टिप्स मिळवण्यासाठी तुमचा रेझ्युमे अपलोड करा.

तुमचा रेझ्युमे येथे टाका किंवा फाइल निवडा.

फक्त PDF आणि DOCX. कमाल फाइल आकार 2MB.

तुमचा रेझ्युमे अपलोड करा
गोपनीयतेची हमी

बंद कार्ड आम्ही धूसर करत नाही

रेझ्युमेच्या कोणत्याही साधनातून एक आकडा काढून घेणे सोपे आहे. त्याच्या जागी काय लिहायला हवे हे कळायला एक संध्याकाळ जाते.

फाइलमध्ये आम्हाला जे सापडते, ते त्याच्या उपायासह येते, आणि हा भाग मोफत आहे. मजकुराच्या बाजूला तुम्हाला स्कोअर, कोणत्या श्रेणीत किती गुण गेले, प्रत्येक क्रिटिकल त्रुटी पूर्ण, आणि तीन लिहून दिलेल्या दुरुस्त्या मिळतात. उरलेल्या त्रुटींच्या दुरुस्तीचा लिहिलेला मजकूर वाचायला मिळणे, पेड प्लॅन खरं तर तेच विकत घेतो.

कुतूहल चाळवण्यासाठी बंद कार्ड धूसर केले जात नाही. त्यावरचा मजकूर तुम्ही वाचू शकत नाही, पण त्रुटी कोणत्या विभागाची आहे, किती जड आहे आणि किती गुण घेऊन जात आहे हे दिसते. उरलेला भाग पैशाच्या लायक आहे की नाही हे ठरवायला एवढेच पुरे. मुद्दा इतकाच आहे.

पेड बाजूला AI तुमचा एक बुलेट नव्याने लिहून देतो आणि निवडण्यासाठी तीन रूपे परत करतो, म्हणजे कोणतीही गोष्ट गुपचूप तुमच्या ओळीची जागा घेत नाही. कोणत्या नोकरीची जाहिरात चिकटवली तर त्यासाठी वेगळा मॅच स्कोअर मिळतो, सोबत जाहिरातीत असलेले पण तुमच्या स्किल्स आणि सर्टिफिकेटमध्ये कुठेच नसलेले शब्द.

मासिक प्लॅन महिन्याला $17.49 आहे. तीन महिन्यांचा प्लॅन महिन्याला $11.66 पडतो आणि दर तीन महिन्यांनी $34.99 कापले जातात. सहा महिन्यांचा प्लॅन महिन्याला $9.33 पडतो आणि दर सहा महिन्यांनी $55.99 कापले जातात. बिलिंग अमेरिकन डॉलरमध्ये होते. रद्द करण्याचे बटण तुमच्या खात्यातील सबस्क्रिप्शन पानावर आहे, पुढच्या कपातीच्या तारखेच्या बाजूलाच, आणि रद्द केल्यानंतरही ज्या कालावधीचे पैसे भरले आहेत त्याच्या शेवटपर्यंत ॲक्सेस चालू राहतो.

तुमचा रेझ्युमे स्कोअर आत्ता मिळवा!

तुमचा ATS स्कोअर तात्काळ पाहण्यासाठी, गंभीर समस्या शोधण्यासाठी आणि सुधारणा टिप्स मिळवण्यासाठी तुमचा रेझ्युमे अपलोड करा.

तुमचा रेझ्युमे येथे टाका किंवा फाइल निवडा.

फक्त PDF आणि DOCX. कमाल फाइल आकार 2MB.

तुमचा रेझ्युमे अपलोड करा
गोपनीयतेची हमी
निकालाची स्क्रीन, जिथे बंद कार्डवरही त्रुटीची गंभीरता आणि गेलेले गुण दिसत राहतात

काम कसे चालते

अपलोड
01

फाइलच अपलोड करा

PDF किंवा Word (.docx), 2 MB पर्यंत. कार्ड नको, खातं नको. मजकूर कॉपी-पेस्ट करण्याऐवजी फाइलच अपलोड करा, कारण लेआउट, फॉन्ट आणि हेडरच्या तपासण्यांना करण्यासारखे काही तेव्हाच असते जेव्हा कागद खरोखर समोर असतो. आणि फक्त रेझ्युमे पाठवा, कव्हर लेटर व मार्कशीट जोडून बनवलेली पूर्ण फाइल नको.

रेझ्युमे फाइलचा अपलोड भाग, PDF किंवा Word, 2 MB पर्यंत
मजकूर
02

कच्चा मजकूर वाचा

तुमच्या फाइलमधून निघालेला मजकूर ओळ क्रमांकासह दिसतो आणि सुरुवातीपासून उघडा असतो. विभागांचा क्रम टिकला आहे का. फोन नंबर आलाच आहे का. नाव देवनागरीत लिहिले असेल तर वेलांट्या आणि जोडाक्षरे नीट बाहेर आली आहेत का. हे तपासायला पार्सरबद्दल काही माहीत असण्याची गरज नाही. फक्त वाचण्याची गरज आहे.

रेझ्युमेचा ओळ-क्रमांकासह कच्चा मजकूर, बाजूला वाचनीयतेच्या त्रुटी
क्रम
03

सर्वात जड त्रुटी आधी

प्रत्येक त्रुटीसोबत ती कोणत्या विभागातून आली आणि किती गुण घेत आहे हे लिहिलेले असते. यादी महाग त्रुटींपासून सुरू होते. वरून सुरुवात करणाऱ्याला पहिल्या अर्ध्या तासात सर्वाधिक मिळते. कोणत्याही त्रुटीवर क्लिक केले की रेझ्युमेमधल्या नेमक्या त्याच जागी पोहोचता.

गंभीरता आणि गेलेल्या गुणांनुसार लावलेली त्रुटींची यादी, रेझ्युमेत पोहोचण्याच्या दुव्यांसह
दुरुस्ती
04

दुरुस्त करा आणि पुन्हा स्कोअर घ्या

एडिटरमध्ये बदल करा. टायपिंग थांबवल्यावर सुमारे अर्ध्या मिनिटाने मजकुराचा स्कोअर आपोआप पुन्हा मोजला जातो. लेआउट आणि फॉन्टच्या त्रुटी तुम्ही अपलोड केलेल्या फाइलशी जोडलेल्या आहेत, आणि एडिटरमध्ये फाइल नसते, म्हणून ते गुण येथे पुन्हा मोजले जात नाहीत. ते दुरुस्त झाले आहेत याची खात्री करायची असेल तर नवी आवृत्ती डाउनलोड करा आणि पुन्हा एकदा अपलोड करा.

एडिटरमधील बदलांनंतर पुन्हा मोजलेला रेझ्युमेचा मजकूर स्कोअर

तुमचा रेझ्युमे स्कोअर आत्ता मिळवा!

तुमचा ATS स्कोअर तात्काळ पाहण्यासाठी, गंभीर समस्या शोधण्यासाठी आणि सुधारणा टिप्स मिळवण्यासाठी तुमचा रेझ्युमे अपलोड करा.

तुमचा रेझ्युमे येथे टाका किंवा फाइल निवडा.

फक्त PDF आणि DOCX. कमाल फाइल आकार 2MB.

तुमचा रेझ्युमे अपलोड करा
गोपनीयतेची हमी

अपलोड करण्यापूर्वी

तुमच्या फाइलमधून काढलेला कच्चा मजकूर. फाइलच्या बाजूची प्रत्येक अडचण, प्रत्येक तिच्या उपायासह: स्कॅन केलेली पाने ज्यांत मजकुराचा थरच नाही, दोन कॉलम आणि साइडबार असलेले लेआउट, मांडणीसाठी वापरलेली टेबल, टेक्स्ट बॉक्स, हेडर किंवा फूटरमध्ये अडकलेली संपर्क माहिती, एम्बेड न केलेले किंवा 9 पॉइंटपेक्षा लहान फॉन्ट, अक्षरांची तुटलेली मॅपिंग, लपलेला मजकूर, पासवर्ड लावलेली फाइल, भरण्याची फॉर्म फील्ड, सजावटीचे बुलेट आणि आयकॉन, आणि असुरक्षित फाइल फॉर्मॅट. त्यासोबत तुमचा स्कोअर, श्रेणीनिहाय गेलेले गुण, मजकुराच्या बाजूची प्रत्येक क्रिटिकल त्रुटी पूर्ण, आणि तीन लिहून दिलेल्या दुरुस्त्या. कार्ड लागत नाही. खातं तेव्हा लागते जेव्हा निकाल जपून ठेवायचा असतो, रेझ्युमे येथेच संपादित करायचा असतो, किंवा नंतर परत यायचे असते.

त्यांतले बहुतेक तुम्ही त्यांच्या पेटीत चिकटवलेला मजकूर वाचतात. आम्ही तुमची फाइल उघडतो. दोन कॉलमचा लेआउट, हेडरमध्ये पडलेला नंबर, तुटलेल्या मॅपिंगचा फॉन्ट, पांढऱ्यावर पांढरे शब्द: यांतले काहीही मजकुरात नसते, कागदाच्या रचनेत असते, म्हणून चिकटवलेली प्रत ते दाखवूच शकत नाही. मजकूर काढण्याचे काम एक ओपन-सोर्स इंजिन करते, जे रेझ्युमे पार्सिंगमध्ये बऱ्यापैकी वापरले जाते. त्याच्या मागे कोणत्या मॉडेलचे मत नाही, ठरलेल्या नियमांची यादी आहे, म्हणून तीच फाइल प्रत्येक वेळी तोच स्कोअर मिळवते. पाच श्रेणी, वेगवेगळ्या वजनासह: फाइल वाचता येते की नाही, याचे वजन सर्वात जड, 30 गुण; त्यानंतर तुमच्या बुलेटमधले पुरावे 26; पूर्णता 16; स्पष्टता आणि सुसंगती 14 प्रत्येकी. जी श्रेणी तुमच्या रेझ्युमेला लागू होत नाही, तिला शून्य देण्याऐवजी हिशोबातूनच वगळले जाते.

विचारा. शब्द निवडण्यात तो खरोखर उपयोगी पडतो. अडचण एकच आहे, चॅटच्या खिडकीत तुम्ही जे चिकटवता तो मजकूर असतो, तुम्ही पाठवणार असलेली फाइल नसते. त्या फाइलमधून पार्सरला काय मिळेल हे सांगण्याचा त्याच्याकडे मार्गच नाही. येथे स्क्रीनवर पहिली गोष्ट तीच असते. पुन्हा लिहून घेण्याचे साधन येथेही आहे, पेड बाजूला. पण क्रम महत्त्वाचा आहे: कागद वाचला जातो की नाही हे आधी मिटवा, विशेषणे निवडण्यात संध्याकाळ नंतर घाला.

किचकट नाही. खात्याच्या सबस्क्रिप्शन पानावर रद्द करण्याचे बटण आहे, मेल लिहावा लागत नाही आणि कोणाला गाठावे लागत नाही. पुढच्या कपातीची तारीख त्याच पानावर लिहिलेली असते, आणि रद्द केल्यानंतरही भरलेल्या कालावधीच्या शेवटपर्यंत ॲक्सेस चालतो. बिलिंग अमेरिकन डॉलरमध्ये होते: मासिक प्लॅनवर दर महिन्याला $17.49, तिमाही प्लॅनवर दर तीन महिन्यांनी $34.99, सहामाही प्लॅनवर दर सहा महिन्यांनी $55.99. भारतासाठी वेगळी रुपयातली किंमत नाही, वार्षिक प्लॅन नाही, आणि मोफत ट्रायल नाही. तुमची बँक स्वतःच्या दराने रुपयांत बदलते आणि बहुतेक भारतीय कार्ड परकीय चलनाचा मार्कअप व त्यावर GST जोडतात, म्हणून स्टेटमेंटमधली रक्कम थोडी वर दिसेल. मोफत असलेला भाग फाइलच्या सगळ्या अडचणी त्यांच्या उपायांसह देतो; उरलेला लिहून दिलेला दुरुस्तीचा मजकूर या खर्चाच्या लायक वाटत नसेल, तर घेऊ नका.

फाइलच्या बाजूला पूर्णपणे. लेआउट, टेबल, फॉन्ट, हेडर आणि अक्षरांच्या मॅपिंगचा भाषेशी संबंध नाही, देवनागरीत लिहिलेला कागदही इंग्रजीसारखाच तपासला जातो. देवनागरी हा स्वतःच एक चांगला तपास आहे: कच्च्या मजकुरात वेलांट्या आणि जोडाक्षरे स्वच्छ येत असतील, तर फॉन्टची मॅपिंग बरोबर आहे. मजकुराच्या बाजूला काही तपासण्या चालतात: विभागांची रचना, गळलेले विभाग, संपर्क माहिती, बुलेटची लांबी, आणि तुम्ही आकड्यांसोबत काम करता की नाही. मुद्दाम बंद राहतात: क्रियापदांचे वैविध्य, वाचनीयतेचे सूत्र, तारखेच्या फॉर्मॅटची तपासणी, शिळ्या वाक्प्रचारांची ओळख, कीवर्ड घनतेची पट्टी, आणि विभागांच्या नेहमीच्या शीर्षकांची यादी. या सहाही इंग्रजीच्या मापावर बसवलेल्या आहेत, आणि मराठीवर लावल्या तर तुमचे गुण उगीच कापले जातील.

बऱ्याच वेळा जातो, लोक समजतात त्याहून जास्त वेळा. मोठ्या कंपनीच्या किंवा MNC च्या करिअर पोर्टलवरून पाठवलेला अर्ज जवळपास नेहमी आधी अशा एखाद्या सिस्टिममध्ये उतरतो; हिंजवडी आणि मुंबईतल्या GCC व मोठ्या IT कंपन्यांमध्ये SAP SuccessFactors किंवा Workday सारखी नावे सामान्य आहेत, आणि कॅम्पस व लॅटरल भरतीची स्वतःची पोर्टलही तशाच पद्धतीने चालतात. नोकरी पोर्टलवर रेझ्युमे ठेवण्याचा मामलाही वेगळा नाही: रिक्रूटर तिथे कीवर्डने शोधतात, आणि तो शोध तुमच्या फाइलमधून निघालेल्या त्याच मजकुरावर चालतो. दुसऱ्या बाजूला नाशिकमधल्या वीस माणसांच्या कंपनीत फाइल सामान्यतः एक माणूस सरळ उघडतो. दोन्ही वेळी पुढे काय होईल हे दोनच गोष्टींवर अवलंबून असते: कागद सहज वाचला जातो का, आणि त्यातला मजकूर त्या पदाशी जुळतो का. दुरुस्त्या दोन्ही वाचकांसाठी उपयोगी पडतात.

बहुतांश नाही, आणि आम्ही यांसाठी मुद्दाम गुण कापत नाही. फोटोमुळे तुमची फाइल वाचता न येण्यासारखी होत नाही. भारतात रेझ्युमेवर फोटो लावणे सामान्य आहे आणि अनेक ठिकाणी अपेक्षितही असते, म्हणून निर्णय तुमचा. खरा धोका वेगळा आहे: पूर्ण रेझ्युमे चित्रासारखा एक्सपोर्ट झाला, तर त्यातले काहीच वाचले जात नाही, आणि जड फोटो 2 MB ची मर्यादाही खाऊन टाकतो. जन्मतारीख, वडिलांचे नाव आणि वैवाहिक स्थिती हेही येथे सवयीने चालून येते; यांची कुठे गरज नाही, फक्त जागा जाते. तारखेचा एकच बरोबर फॉर्मॅट नसतो. 03/2019 ते 08/2022 चालते, महिन्याचे नाव लिहिणेही चालते, फक्त पूर्ण कागदात एकच पद्धत ठेवा. एक पान ही आवड आहे, नियम नाही; आठ वर्षांचे काम एका पानात दाबल्यावर मार्जिन आणि ओळींतले अंतर मरते आणि वाचणेच जड होते. कीवर्ड कोंबण्याचा सल्लाही आम्ही देत नाही: लपवलेले कीवर्ड सापडले तर आम्ही ते अडचण म्हणून दाखवतो. शेवटी प्रश्न दोनच आहेत. कागद स्वच्छ वाचला जातो का, आणि त्यातला मजकूर त्या पदाशी जुळतो का.

होय. प्रत्येक त्रुटी एडिटरमधल्या नेमक्या त्याच जागी नेते, तिथेच बदल करा. पेड प्लॅनवर एखादा बुलेट पुन्हा लिहून घेऊन तीन रूपांतून निवडता येतो; त्यांतले कोणतेही आपोआप तुमचा मजकूर बदलत नाही. फाइल स्वच्छ वाचली जायला लागली, की OwlApply जॉब बोर्ड याच रेझ्युमेनुसार नोकऱ्या क्रमाने लावतो, आणि सर्वात जुळणाऱ्या वर येतात.

तुमचा रेझ्युमे स्कोअर आत्ता मिळवा!

तुमचा ATS स्कोअर तात्काळ पाहण्यासाठी, गंभीर समस्या शोधण्यासाठी आणि सुधारणा टिप्स मिळवण्यासाठी तुमचा रेझ्युमे अपलोड करा.

तुमचा रेझ्युमे येथे टाका किंवा फाइल निवडा.

फक्त PDF आणि DOCX. कमाल फाइल आकार 2MB.

तुमचा रेझ्युमे अपलोड करा
गोपनीयतेची हमी

42% अधिक रिक्रूटर प्रतिसाद

प्रत्येक रेझ्युमे टेलर करा, डेटा-आधारित कीवर्ड्सने तुमची योग्यता सिद्ध करा, आणि एका डॅशबोर्डवरून अर्ज ट्रॅक करा.

स्मार्ट सामग्री

प्रमाणित रेझ्युमे लेखकांनी तपासलेल्या भूमिका-विशिष्ट बुलेट्स आणि सारांश जोडा.

अचूक लक्ष्यीकरण

कोणत्याही जॉब पोस्टिंगशी जुळवा आणि फिट स्कोअर तात्काळ अपडेट पहा.

डिझाइन नियंत्रण

प्रत्येक अर्ज ब्रँडशी सुसंगत ठेवण्यासाठी रंग, फॉन्ट्स आणि स्पेसिंग समायोजित करा.

माझा रेझ्युमे तयार कराकव्हर लेटर लिहा

OwlApply शी जोडले जा

LinkedIn वर फॉलो कराYouTube वर पहाPinterest वर पिन कराInstagram वर सामील व्हाFacebook वर लाइक कराX वर फॉलो कराMedium वर फॉलो कराTikTok वर फॉलो करा
रेझ्युमे तयार करा
मराठीBahasa IndonesiaBahasa MelayuCatalàČeštinaDanskDeutschEestiEnglishEspañolFilipinoFrançaisHrvatskiItalianoKiswahiliLatviešuLietuviųMagyarNederlandsNorskPolskiPortuguês (Brasil)Português (Portugal)RomânăSlovenčinaSlovenščinaSrpskiSuomiSvenskaTiếng ViệtTürkçeΕλληνικάБългарскиРусскийУкраїнськаעבריתالعربيةفارسیहिन्दीবাংলাગુજરાતીதமிழ்తెలుగుಕನ್ನಡമലയാളംไทยአማርኛ日本語简体中文繁體中文한국어

नोकरी शोधणारे

  • रेझ्युमे तयार करा
  • रेझ्युमे उदाहरणे
  • रेझ्युमे टेम्पलेट्स
  • कव्हर लेटर टेम्पलेट्स
  • नोकरी शोध सहाय्यक
  • जॉब ट्रॅकर

करिअर संसाधने

  • रेझ्युमे मदत
  • नोकरी मुलाखत
  • करिअर
  • कव्हर लेटर
  • OwlApply एक्स्टेंशन
  • ब्लॉग

AI साधने

  • कव्हर लेटर बिल्डर
  • AI रेझ्युमे ऑप्टिमायझर
  • जॉब अर्ज ऑटोफिल
  • AI रेझ्युमे बिल्डर
  • ATS रेझ्युमे स्कॅनर
  • सर्व AI साधने

सहाय्य

  • किंमत
  • FAQ
  • आमच्याशी संपर्क साधा
  • सेवा अटी
  • गोपनीयता धोरण
  • कुकी धोरण
  • माघार घेण्याचा अधिकार

Copyright 2026 OwlApply. सर्व हक्क राखीव.